रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दूर पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी वाढू लागल्यामुळे रेल्वेने चार गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेस तसेच उधना ते मंगळूरू या मार्गावरील विशेष गाडीचा यात समावेश आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम (१२२२३ / १२२२४) ही दुरंतो एक्सप्रेस तसेच उधना ते मंगळुरू दरम्यान धावणारी (०९०५७/०९०५८) ही विशेष गाडी या गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अनुक्रमे चार व दोन स्लीपर श्रेणीचे डबे वाढवण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गर्दी वाढल्यामुळे डबे वाढवलेल्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलमदरम्यान धावणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेस गाडीला दि. १८ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी स्लीपर श्रेणीचे चार डबे वाढवण्यात आले आहेत.
याचबरोबर सुरतजवळील उधना जंक्शन ते मंगळूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला दिनांक १९ नोव्हेंबर ०२३ व २० नोव्हेंबर २०२३ च्या फेरीसाठी स्लीपर दर्जाचे दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत…
कोकण रेल्वे मार्गावर सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्यामुळे तसेच ख्रिसमसचा कालावधी असल्याने वाढती गर्दी रोखण्यासाठी रेल्वेने सध्या धावत असलेल्या गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 20/Nov/2023
