गुहागर : खोटे प्रतिज्ञापत्र करून सातबारावर नावे लावून फसवणूक केल्याचा प्रकार गुहागरात उघड झाला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. परशुराम सखाराम खेडेकर (रा. पेवे, पारदळेवाडी-गवळीवाडी, गुहागर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
खेडेकर यांनी पेवे पारदळेवाडी गवळीवाडी येथील सहमिळकतदारांना कोणतीही कल्पना न देता, ३० मे २०११ रोजी तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्राद्वारे त्याने सातबाऱ्यावर आपले नाव लावून घेतले. त्याने सादर केलेले हे प्रतिज्ञापत्र खोटे असून, सहमिळकतदारांनी याबाबत शनिवारी (१८ नोव्हेंबर) गुहागर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी परशुराम खेडेकर याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,४१५,१९३,१९९,२०० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 20-11-2023
