युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह महिलांची चिपळूण न. प. वर धडक

0

चिपळूण : वारंवार तक्रार करूनही अधिकारी, 1 कर्मचारी दखल घेत नाहीत. हे दूषित पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का, असा सवाल करीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोहसह पदाधिकारी व महिलांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना व मचूळ व खारट पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला. काही दिवसांत यामध्ये र सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन द छेडू, असा इशाराही यावेळी प्रशासनाला दिला.

गेले कित्येक दिवस चिपळूण शहर न परिसरात नगरपालिकेकडून मचूळ व खारट पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक नागरिक व महिलांनी गुरुवारी सायंकाळी नगरपालिकेवर धडक दिली. विशेष म्हणजे ताशा वाजवत पदाधिकारी नगरपालिका कार्यालयात शिरले. यानंतर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे यांची भेट घेत दूषित पाणीपुरवठ्याबाबत चर्चा केली. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष साजिद सरगुरोह, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी केली. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्या श्रध्दा कदम, माजी नगरसेविक सफा गोठे, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष ऋषीकेश शिंदे, रऊफ काझी, मंजुर सुर्वे, काँग्रेस कार्यकर्ते नईम खाटीक यांच्यासह नागरिक व महिला, तसेच आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर व अधिकारी उपस्थित होते. यानंतर आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यामध्ये बदल न झाल्यास युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here