रत्नागिरी : कोंडवी-चिंद्रवलीच्या वार्षिक कार्तिकी उत्सवाला २२ पासून सुरुवात होणार आहे.
श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थानाचा उत्सव २२ पासून २८ पर्यंत साजरा होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सतिश मुळ्ये यांनी केले आहे.
दि. २२ ते २६ रोजी पर्यंत सकाळी श्रींची शोडषोपचार पूजा, अभिषेक; सायंकाळी आरती, भोवत्या, कीर्तन व प्रसाद होणार आहे. २७ रोजी दु. २ वा. कीर्तन, बाळगोपाळांचे खेळ, दहिकाला, भोवत्या व गंगास्नान; सायं. ७ ते रात्री ९ वा. आरती, भोवत्या; रात्री १०:३० वा. मंगलाचरण, रात्री ११ वा. ‘जिन चिक जिन’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. २८ रोजी श्री सत्यनारायण पूजा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 20-11-2023
