रत्नागिरी : जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत भात विक्रीसाठी अंतिम मुदत

0

रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, शासनाकडून भाताला प्रतिक्विंटल २१८३ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच भातविक्री करता येणार आहे. उन्हामुळे भात तयार झाले असून, सर्वत्र कापणीची लगबग सुरू झाली आहे. शासनाकडून ३० नोव्हेंबरपर्यंत ‘भात विक्रीसाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. कापणीमुळे नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

दरवर्षी मार्केटिंग फेडरेशनतर्फे भातखरेदी करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यात १४ केंद्रांवर खरेदी करण्यासाठी सुविधा उपलब्ध होते. यावर्षी ‘अ’ वर्गातील अवघ्या सात केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, मिरवणे, आकले, गुहागर, खेड, दापोली केंद्रांवर भातखरेदी करण्यात येणार आहे. दि. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास विक्री करणे सुलभ होणार आहे.

डिसेंबरपासून भात खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी वंचित राहत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. तरच विक्रीसाठी प्रतिसाद वाढू शकतो. भातासाठी शासनाने प्रतिक्विंटल २१९८३ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी हजारो शेतकरी सहभागी होऊन भात विक्री करत असतात. अनेक शेतकरी गावठी भात विकून बारिक भात खरेदी करतात. खरेदी विक्री संघातर्फे दरवर्षी भात खरेदी करण्यात येते.

गतवर्षी सर्वाधिक प्रतिसाद
भात विक्रीनंतरच पैसे ऑनलाईन शेतकऱ्याच्या खात्यावर तत्काळ जमा होत आहेत, त्यामुळे या संधीचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील १८४१ शेतकऱ्यांनी ३३ हजार २४०.८० क्विंटल भाताची विक्री ‘केली होती. गतवर्षी तुलनेने भातविक्रीसाठी सर्वाधिक प्रतिसाद लाभला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here