मंडणगड : महत्प्रयासाने सुरू झालेला म्हाप्रळ-आंबेत पूल पुन्हा एकदा तालुक्यात चर्चेचा विषय बनत आहे. या पुलाखालून होणाऱ्या बार्जेसमधील वाळू वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
यामुळे म्हाप्रळ तसेच संपूर्ण तालुक्यातून याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याची मागणी करण्यात येत आहे.
गेली चार वर्षे दुरूस्तीच्या कामासाठी बंद असलेला आंबेत- म्हाप्रळ पूल २० ऑक्टोबरपासून वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मंडणगड-दापोली या दोन तालुक्यांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. असे असताना या पुलाला आता वाळू वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 20-11-2023
