गुहागर तालुक्यात कुष्ठ, क्षयरुग्णांची शोधमोहीम

0

गुहागर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुहागर तालुक्यामध्ये २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी तालुक्यातील १,३४,४९१ इतकी लोकसंख्या निवडली असून या लोकसंख्येमध्ये ३४.९१८ इतक्या घरांमध्ये तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत एकूण १२१ इतक्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे २४२ कर्मचारी व २४ पर्यवेक्षक काम करणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका अशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची व कुष्ठरुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. निदान झाल्यास मोफत उपचार केला जाणार आहे.

जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निश्चित केले असून समाजातील निदान न झालेले कुष्ठ व क्षय रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. लक्षणे असल्यास आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्याकडून मोहिमेदरम्यान जनतेने तपासणी करून घ्यावी.

तालुक्यातील आबलोली, चिखली, हेदवी, कोळवली व तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत, अशी डॉ. जांगीड यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here