रत्नागिरी : दारू प्यायल्यानंतर चॉकलेट समजून रेटॉल ट्यूब खाल्ल्याने प्रौढाचा मृत्यू

0

रत्नागिरी : दारू प्यायल्यानंतर चॉकलेट समजून मूषकनाशक रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिपळूण शहरातील कावळीतळी परिसरातील मकसूद हाजम भाई असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मकसूद यांना दारूचे व्यसन होते. दारू प्याल्यानंतर त्यांना चॉकलेट खाण्याचीही सवय होती. नेहमीप्रमाणे मकसूद यांनी गेल्या ५ नोव्हेंबर रोजी रात्री दारू प्यायल्यानंतर चॉकलेट समजून रेटॉल ट्यूब खाल्ली. त्याचा त्रास त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ चिपळूणमधील एस. एम. एस. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना अधिक उपचारासाठी पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here