रत्नागिरी : मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे येत्या मंगळवारी, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी इच्छापूर्तीसाठी ज्योतीध्यान या विषयावर विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
मंगळवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या नरहर वसाहत (शिवाजीनगर) येथील सभागृहात ज्ञानप्रकाश यात्रेअंतर्गत हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सायंकाळी पावणेपाच वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर व्यत्यय येऊ नये, यासाठी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याची सूचना रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 20-11-2023
