पशुधन पर्यवेक्षक पदाच्या संख्येत वाढ करण्याची मागणी

0

रत्नागिरी : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात २६ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक ३७६ पदाचे अर्ज मागवून आयबीपीएस या खासगी कंपनीकडून दि. ९ सप्टेंबर ते १० सप्टेंबरदरम्यान परीक्षा घेण्यात आल्या. पशुधन विभागात पदोन्नती, सेवानिवृत्तीमुळे पशुधन पर्यवेक्षकांच्या रिक्तपदांची संख्या वाढणार आहे. त्याची दखल घेत पशुधन पर्यवेक्षक पदाच्या भरती संख्येत वाढ करावी, अशी मागणी कोकण विभाग कृषी पदवी /पदविकाधारक संघर्ष समितीने केली आहे.

याबाबतचे निवेदन राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन आयुक्त यांना दिले आहे. निवेदनानुसार, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २६ मे २०२३ रोजी पशुधन पर्यवेक्षक गट-कनियक्तीकरिता ३७६ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

तब्बल आठ वर्षांनंतर ही जाहिरात आल्याने याला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत २२ हजर अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२३ मध्ये पशुधन पर्यवेक्षकांकरिता दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात १२८ पशुधन पर्यवेक्षकांची सहायक पशुधन विकास अधिकारी पदावर पदोन्नती होणार आहे. त्यासोबतच डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पशुधन पर्यवेक्षक सेवानिवृत्त होतील. त्याची दखल घेत भरती प्रक्रियेत १२८ पदांची वाढ करावी, अशी मागणी आहे.

भरती प्रक्रिया यंदाच व याच जाहिरातीमध्ये राबवावी, अशीदेखील मागणी या संघर्ष समितीने शासन व लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here