कोकण रेल्वेमध्ये कोकणातील बेरोजगारांना संधी द्यावी : शौकत मुकादम

0

चिपळूण : परशुराम भूमीतून धावणाऱ्या रेल्वेचे नाव हे कोकण रेल्वे आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जागा, जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या तसेच व्यावसाय, उद्योगही गेले व हजोरो लोकांनी कोकण रेल्वेला सहकार्य केले. आता कोकण रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थीभरती होणार आहे. यामध्ये कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी. भरतीमध्ये कोकणाच्या बाहेरचा किंवा परप्रांतीय बेरोजगारांची भरती केलीत तर याद राखा, असा इशारा कोकण अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे.

कोकण रेल्वे प्रशिक्षणासाठीच्या इच्छुक असणाऱ्या बेरोजगारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत नोकरसाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी विनामूल्य अर्ज करायचे आहेत. कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे वय हे किमान १८ ते कमाल वय २५ असणे आवश्यक आहे. तसेच प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमयदित सवलत दिली जाईल.

कोकण रेल्वेने भरतीची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने केली असून यामध्ये सिव्हील इंजिनीअर ३०, इलेक्ट्रिकल इंजिनिअर २०, इलेक्टॉनिक्स इंजिनिअर १०, मेकॅनिकल इंजिनिअर २०, डिप्लोमा सिव्हिल ३०, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स १०, डिप्लोमा इलेक्ट्रिकल २०, डिप्लोमा मेकॅनिकल २० सामान्य पदवीधर ३० पदे अशा पद्धतीने भरती होणार आहे. कोकणाच्या बाहेरील उमेदवाराची निवड होता कामा नये, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here