चिपळूण : बँकेतून बोलतोय, असे सांगून मोबाईलवर पाठवलेली लिंक डाउनलोड करण्यास भाग पाडून त्याआधारे ६२ हजार ७७३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अमर अनिल नलावडे (३३, रा. चिपळूण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर हे घरी असताना त्याच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करून बँकेतून बोलतोय, असे सांगितले. या वेळी अमर यांच्या क्रेडिट कार्डची माहिती विचारणा केली तसेच त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेली लिंक अज्ञाताने डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्याआधारे अमर यांच्या संबधित बँकेच्या क्रेडिट कार्ड खात्यातून सहावेळा व्यवहार करून ६२ हजार ७७३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार अमर यांच्या लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 21-11-2023
