राजापूर : ‘मोदी आवास घरकूल’च्या कागदपत्रांची अट शिथिल करण्याची मागणी

0

राजापूर : मोदी आवास घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विधवा महिलेचा जातीचा दाखला प्रस्तावासोबत असणे गरजेचे आहे. जातीच्या दाखल्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना आधीच दमछाक होत आहे. वयस्कर असलेल्या विधवा महिलेच्या जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची शोधाशोध कुठे आणि कशी करायची, आणि लाभार्थ्यांनी लाभ घ्यायचा कसा? असा सवाल कुणबी समाजोन्नती संघाचे राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी उपस्थित केला आहे.

मोदी आवास घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या जातीचा दाखला, अधिवास दाखला या कागदपत्रांची अट शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संबंधित पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, त्यांच्याशी आपली चर्चाही सविस्तरपणे झाली आहे. त्यामध्ये मोदी आवास घरकूल योजनेचा लाभ घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणीसंबंधित चर्चा करण्यासाठी लवकरच प्रशासकीय बैठक आयोजित करण्याचे त्यांनी आश्वासित केल्याची माहिती नागले यांनी दिली.

ओबीसी समाजातील बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मोदी आवास घरकूल योजना जाहीर केली आहे. आगामी तीन वर्ष ही योजना राबवण्यात येणार असून, सुमारे १० लाख लाभार्थ्यांना आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड करताना विधवा, पूरग्रस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी, जातीय दंगलींमुळे घराचे नुकसान झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य अपेक्षित आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्यांना कशा पद्धतीने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोदी आवास योजनेसाठी पात्र असलेल्या ओबीसी समाजातील विधवा महिलांना घरकुलासाठी प्रस्ताव सादर करताना त्याच्यासोबत जातीचा दाखला आणि अधिवास दाखला जोडणे अपेक्षित आहे. जातीच्या दाखल्यांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना आधीच लोकांची दमछाक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 21/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here