रत्नागिरी : विदेशी मद्याची चोरटी विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वृद्ध संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र गिरीधर पाटील (वय ६४, रा. फणसवळे सदाफळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
हा प्रकार रविवारी (ता. १९) सायंकाळी संशयिताच्या घराच्या पाठीमागे झाडाखाली निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस अमंलदार विनोद भितळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 21-11-2023
