खेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ते १० नोव्हेंबर रोजी धुळे येथे झालेल्या १४ वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये ज्ञानदीप संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील इयत्ता आठवीतील मुक्ता शितल पेठे हिने यश संपादन केले आहे. तिची महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघामध्ये निवड झाली आहे.
मुक्ताच्या या नेत्रदीपक यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. व पुढे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी तिला संस्था व प्रशालेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. मुक्ताला क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केले.
मुक्ताच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लट्ठा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 21-11-2023