देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील एकादशी उत्सव या वर्षीपासून पुन्हा सुरू केला जाणार आहे. गावाने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविले असून, हा उत्सव तीन दिवस चालणार आहे.
या उत्सवाच्या दिवशी दुकाने थाटली जाणार असून, विविध कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजता तालुकास्तरीय ७० किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा उद्घाटन, श्री ग्रामदेवी जुगाई ऑफ व्हिलेज कोसुंब शेतकरी कष्टकरी संघटना व बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे.
दि. २३ रोजी सकाळी ६ वाजता विठ्ठल रुक्मिणी महापूजा, वाजल्यापासून दर्शन, भजने व विविध ठिकाणाहून दिंडी कार्यक्रम, दुपारी १ वाजता बैल गाडी स्पर्धा, व रात्री १० वा. सुप्रसिद्ध रजनी गोरड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा, रात्री १२ वा. छबीना अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्तिकी एकादशी उत्सव समिती, कोसुंब यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 21/Nov/2023
