रत्नागिरी : जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ

0

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट (१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धेचे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा १४ वर्षाआतील मुले व मुली साठी २७ नोव्हेंबर रोजी, १७ वर्षाआतील मुले व मुली २८ नोव्हेंबर रोजी तर १९ वर्षांआतील मुले व मुली २९ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. अधिक माहितीकरिता सिद्धेश गुरव यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 21/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here