लांजा येथे अपंग मुलाचा आकस्मिक मृत्यू

0
Close-up of dead body feet at morgue or hospital with toe label or information ring and identification blank tag. Cadaver lying on steal table covered with sheet on autopsy table. Death concept.

रत्नागिरी : लहान मुलाला उपचारास नेले असता अचानक त्याची हालचाल बंद झाली. लांजा अधिक उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यश कल्याण घाडगे (वय १२, रा. आंबवडे वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) दुपारी अडीचच्या सुमारास लांजा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश हा सहा वर्षाचा असताना अचानक तो दोन्ही पायाने अपंग होत गेला. तेव्हापासून त्याच्यावर अनेक ठिकाणी औषधोपचार करून तो बरा होत नव्हता. खबर देणार यांनी सोशल मिडीयाच्या युट्यूब चॅनलवर भांबेड, तेलीवाडी, ता. ) येथे लहान मुलांच्या अपंगत्वावर उपचार करून बरे करत असल्याचा व्हिडीओ पाहून यश घेऊन आले होते.

यशवर उपचार सुरू असताना अचानक त्याची हालचाल बंद झाली. तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता म्हणून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड व तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत लांजा पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 21/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here