लांजा : दाभोळे लांजा रस्त्यावरील मोऱ्यांचे काम व्यवस्थित करून घेण्याची मागणी

0

लांजा : दाभोळे लांजा रस्त्यावरील मोऱ्यांचे काम व्यवस्थित करून घ्यावे, सदर मोऱ्यांचे काम बुधवार पासून सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उप विभाग लांजाचे उपअभियंता प्रमोद भारती यांना सादर करण्यात आले.

या निवेदनात दाजी गडहिरे यांनी म्हटले आहे की, आपल्या विभागाकडून सन २०२२-२३ मध्ये दाभोळे असगे लांजा या रस्त्यावर पाच मोऱ्यांचे काम करण्यासाठी निविदा कडून काम करण्यात आले आहे. सदर ठिकाणी जुन्या मोऱ्या होत्या, पण सदर मोऱ्यांवरून पावसाळ्यात पाणी जात होते. त्यामुळे वाहतूक ठप्प होत होती व रस्ता नेहमी खराब होत असे .त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी आपल्या विभागाकडून सदर मोऱ्यांची उंची वाढवून रस्त्यावर पाणी येणार नाही हा उद्देश होता पण हा उद्देश पुर्ण झाला नाही. कारण नवीन मोऱ्यांची उंची खूपच कमी ठेवली आहे. त्यामुळे नवीन मोऱ्यां बांधून काहीही उपयोग झालेला नाही. या पावसाळ्यामध्ये सदर मोऱ्यांवरून पाणी वाहून गेल्यामुळे सर्व रस्ता खराब झाला आहे व मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

तरी आपण सदर मोऱ्यांचे काम बुधवार दिनांक २२/११/२०२३ पासून सुरू करण्यात यावे व सदर कामाचे ठेकेदारास कोणताही मोबदला किंवा बील अदा करण्यात येवू नये. सदर मोऱ्यांचे काम बुधवार पासून सुरू न झाल्यास बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दाजी गडहिरे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here