रत्नागिरी लायन्स क्लबच्या वॉकेथॉनला प्रतिसाद

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेल्या वॉकेथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. चाळीस वर्षांवरील पुरुष, महिला, ५० व ६० वर्षांवरील पुरुष गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेत एकूण १४० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी आणि ज्येष्ठ उद्योजक उदय लोध उपस्थित होते.

चाळीस वर्षांवरील पुरुषांच्या गटात योगेश कदम, मंदार मोरे, मच्छींद्र आंब्रे यांनी गुणानुक्रमे यश मिळवले. याच गटातील महिलांमध्ये केतकी लेले, मानसी मराठे, निशिगंधा नवरे, पन्नास वर्षांवरील पुरुषांच्या गटात काशिनाथ पाटील, संभाजी देसाई आणि संजय मलिंगे यांनी यश मिळवले. साठ वर्षांवरील पुरुषांच्या गटात निशातराम विश्वकर्मा यांनी प्रथम, दिनेश जैन द्वितीय आणि गजानन भातडे यांनी तृतीय क्रमांकाचे यश मिळवले. विशेष म्हणजे या स्पर्धेत ८८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनीदेखील सहभाग घेऊन तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.

या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, अशा प्रकारची वॉकेथॉन आयोजित केल्याबद्दल आयोजक कौतुकास पात्र आहेत.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व सदस्य, समर्थ इन्व्हेस्टमेंटचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या टीमकडून सर्व स्पर्धकांचे स्पर्धेनंतर कूलडाऊन सेशन घेण्यात आले. या स्पर्धेकरिता समर्थ इन्व्हेस्टमेंट आणि लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरी, हातखंबा रॉयल, देवरूख, संगमेश्वर लायन्स क्लबने मदत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here