जाकादेवी : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील श्री. शिवाजी विद्यानिकेतन पेठवडगाव येथे आयोजित रस्ता सुरक्षा दल राज्यस्तरीय प्रशिक्षणात रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांनी आर. एस.पी आणि नागरी संरक्षण कायदा संदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांचे उद्बोधन केले. रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण कायदा है। राज्यस्तरीय प्रशिक्षण दि. १६ ते २५ नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षण श्री. शिवाजी विद्यानिकेतन पेठवडगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणास रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सी. सुवर्णा सावंत यांनी प्रत्येक्ष भेट देऊन बहुमोल मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा दल नागरी संरक्षण कायदा या संदर्भातील काळाचे महत्व ओळखून या प्रशिक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे ट्रेनिंग अतिशय आवडीने पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले. आपत्कालीन स्थितीत भारतीय नागरिकांना संरक्षण देण्यासाठी आपण सदैव कार्यप्रवण असल्याने त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणातून अनेक प्रसंग कथन करून प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या. शिबीरास्थळी पुरविलेल्या सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांचे राज्यमहासमादेशक अनिल कुंभार यांनी शाल, बुके देऊन त्यांचे स्वागत केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 21/Nov/2023
