रत्नागिरी : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ आणि २४ असा दोन दिवस हा दौरा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे बैठका होणार आहेत. त्यांचा हा दौरा ठाकरे शिवसेनेतील मरगळ झटकणारा ठरणार आहे. तसेच राजकीयदृष्ट्या तो महत्त्वाचा आहे.
आदित्य ठाकरे २३ नोव्हेंबरला सकारी ११ वाजता लीना कुबल याच्या अंगणात बैठक होणार आहे. १२.२५ ला कुडाळ येथे चंद्रकांत कासार यांच्या घरी बैठक होणार आहे. बांबार्डे, कणकवली, देवगड येथे दुपारी ३ वाजेपर्यंत अशा प्रकारे बैठका होणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते राजापूरला प्रयाण करणार आहेत. ५ ते रात्री ८ पर्यंत त्यांच्या करबुडे येथे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होणार आहेत. २४ ला दुपारी सव्वा बारा वाजता जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची भेट ते घेणार आहेत. त्यानंतर साडेबाराला आमदार भास्कर जाधव यांच्या घरी १.५५ मिनिटांनी माजी आमदार संजय कदम यांच्या घरी बैठक होणार आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ते महाडला रवाना होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 21/Nov/2023
