खेड : मालवाहू रिक्षा टेम्पो-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

0

खेड : मालवाहू रिक्षा टेम्पोला दुचाकीची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू होण्याची घटना रविवारी, सायंकाळी कुंभाड ते खोपी मार्गावरील पुलाजवळ घडली आहे. अंकीत तांबे (वय २८, रा. कुंभाड, ता. खेड) असे मयत युवकाचे नाव आहे. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला असून त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मयत अंकीत तांबे हा दुचाकीने कुंभाड ते खोपी असा मित्राला घेऊन यामा एफ झेड गाडीने भरधाव वेगाने जात होता. त्याचदरम्यान खोपीकडून कुंभाडकडे जाणाऱ्या मालवाहू रिक्षा टेम्पोला कुंभाड पुलाजवळ दुचाकीची जोरदार धडक बसली.

सदर धडक एवढी जोरात होती की, अंकीतचा याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असणारा अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकित हा एकुलता एक मुलगा असून त्याचा निधनानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here