संगमेश्वर : शेरेवाडी विकास मंच व तालुका कृषी अधिकारी संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 24/11/2023 रोजी सकाळी 10.30 वा. शेरेवाडी, अंत्रवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात भव्य अशा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अंत्रवली पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधवांना आमंत्रित करण्यात येत असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती शेरेवाडी विकास मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर शेतकरी मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी संगमेश्वर हे सर्वांना शेती संबंधित सर्व शासकीय योजनांची माहिती शेतकरी बांधवांना देणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेचे मार्गदर्शन सुद्धा केले जाणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण, संगमेश्वर विधानसभा व आपले सर्वांचे लाडके आमदार श्री. शेखरजी निकम हे उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करावे, असा आग्रह शेरेवाडी विकास मंचाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 21/Nov/2023
