राजापूर : प्रतिवर्षाप्रमाणे तालुक्यातील फुपेरे-भोवडवाडी उत्कर्ष मंडळातर्फे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात गुरुवारी (ता. २३) कार्तिक एकादशी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ७ से ८ वारकरी दिंडी, ८ ते १० पूजापाठ आरती, १० ते १२ सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी २ ते ३ हळदीकुंकू, दुपारी ३ ते ४ उपासनायज्ञ, सायंकाळी ४ वाजल्यापासून नामांकित भजने होणार आहेत.
सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भोवडवाडी उत्कर्ष मंडळ फुपेरेचे अध्यक्ष विलास भोवड, कार्याध्यक्ष नामदेव भोवड, सचिव प्रमोद भोवड, खजिनदार विनित भोवड यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 21-11-2023
