संगमेश्वर : आईकडून मिळालेली प्रेरणा घेऊन जसे माझे कुटुंब उभे राहिले, तसा माझा गाव, तालुका व समाज अभिमानाने उभा राहावा, ही प्रांजल भावना घेऊन मी सर्वसामान्यांची सेवा करत आहे. तालुक्यातील गोरगरीब शेतकन्यांना पंढरपूरला नेताना मला आनंद होतोय. या वारकन्यांच्या माध्यमातून मी माझ्या आई वडिलांनाच वारीता नेतोय, असे मला वाटतेय. सामान्यांच्या सेवेतून मिळालेले समाधान जीवन जगण्याला दुप्पट बळ देते, असे प्रतिपादन उद्योजक व लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कदम यांनी केले.
कार्तिकी एकादशी वारीनिमित्ताने सुरेश कदम यांच्या पुढाकाराने तालुक्यातील वारकऱ्यांना मोफत १० बस उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (१९ नोव्हेंबर) देवरुखमधील मराठा भवन येथे झाला. यावेळी कदम म्हणाले की, या परमार्थिक कार्यासाठी माझ्या कुटुंबासह माझा मित्र परिवार मला साथ व पाठिंबा देत आहे. त्यामुळेच हे शक्य होत आहे. त्यांच्या प्रेमामुळे समाजासाठी मला थोडेबहुत करता येत असल्याचे शेवटी स्पष्ट केले.
सामान्यांच्या सेवेतून शोधलेला परमार्थ कौतुकास्पद भास्कर जाधव
या उपक्रमाच्या शुभारंभावेळी आमदार भास्कर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, संगमेश्वर तालुक्यातील गोरगरीब वारकन्यांना पंढरीची वारी घडवण्याचे काम सुरेश कदम यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे होत आहे. स्वतःच्या आई-वडिलांना जणू काही वारीला नेतोय ही त्यांची सामान्यांप्रती असलेली भावना आणि सामान्यांच्या सेवेत त्यांनी शोधलेला परमार्थ कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
लक्ष्मीवात्सल्य सेवाभावी संस्था किरवाडी यांच्यातर्फे वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी घडवण्याकरिता १० एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आता. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती जयसिंग माने, वेदा फडके, बाबा सावंत, पुयुत्सू आतें, विनोद झगडे, सुरेश बने, मुन्ना थरवळ, नंदादीप बोरुकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 21/Nov/2023
