जिल्हा रुग्णालयात पुरेशी कोरोना टेस्टिंग किट; ना. उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील लॅबमध्ये कोरोना टेस्टिंग किट उपलब्ध असून ती आणखी दोन दिवस पुरतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार किट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. किटअभावी कोरोना विषाणूची तपासणी थांबणार नाही, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. झूम अॅपवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोना निवारणासाठी आठ कोटींचा निधी पडून आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंग किटबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने केली जाणार आहे. ज्या ठेकेदाराने ही किट पुरवली होती. त्याचा बिलाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो ही सोडवण्यात येईल, असे ना, सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:01 AM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here