रत्नागिरी : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेली 35 वर्ष कार्यरत असणाच्या योगायोग मित्र मंडळ हातखंबातर्फे व TWJ आर्चरी अकॅडमी यांच्या सहकार्याने एक दिवसीय धनुर्विद्या शिबीराचे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सिद्धगिरी मंगल कार्यालय हातखंबा येथे आयोजन केले होते.
शहरी ते ग्रामीण भागातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपती पारंपरिक युद्ध कला व आत्ताचे आंतरराष्ट्रीय क्रीडा कौशल्य शिकण्याची संधी मिळावी या हेतूने मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सदर शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराता रत्नागिरी शहर, ग्रामीण तसेच मुंबईपासून एकूण 83 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवून हे शिबिर उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन पुष्कराज स्पोर्ट शूटिंग अकॅडमीचे मालक व प्रशिक्षक श्री. पुष्कराज इंगवले यांच्या शुभहस्ते व हातखंबा गावचे सरपंच श्री. जितेंद्र तारवे, मंडळाला नेहमी सहकार्य करणारे प्रा. चंद्रमोहन देसाई, गोसेवा संघ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. गणेश गायकवाड अकॅडमीच्या प्रशिक्षिका अनामिका अबेरे आणि टीम, सिद्धगिरी मंगल कार्यालयाचे मालक श्री शिवानंद जठार, सामाजिक कार्यकर्ते श्री भाई दळी व योगायोग मित्र मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडले.
शिबिराता लाभलेली प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती व धनुर्विद्या शिकण्याचा उत्साह पाहून आयोजित केलेल्या शिबिराचा उद्देश सार्थकी तागल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे सहभाग प्रमाणपत्र सम्मानपूर्वक देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी सावंत सावेकर यांनी केले तर मंडळाचे सदस्य श्री. गजानन कामेरकर यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 21/Nov/2023
