रत्नागिरी : कार्तिकी एकादशीसाठी जिल्ह्यातून एकूण १५३ एस.टी. बसेस पंढरपूरला रवाना झाल्या आहेत.
दि. २३ रोजी एकादशी साजरी झाल्यानंतर दि. २४ रोजी या सर्व गाड्या पुन्हा रत्नागिरीला परतणार आहेत.
आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. मात्र, या दिवसात जिल्ह्यात भात लागवडीची कामे सुरू असतात. त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला जातात. रत्नागिरी आगार वगळता अन्य सर्व आगारांतून जादा गाड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. दापोलीतून २७, खेडमधून २६, चपळुणातून ८, देवरूखातून १६, लांजातून ३३, राजापुरातून ४२, मंडणगड व गुहागर आगारातून प्रत्येकी एक मिळून एकूण १५३ गाड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध भागांतून कार्तिकी एकादशीनिमित्त दिंडी काढली जाते. काही भाविक पायी तर काही भाविक एस.टी.तून प्रवास करतात. भात कापणीची कामे उरकून भाविक पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 21-11-2023
