यंदा मूर्ती घडवण्यात येणार नाही; चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव उत्सव साजरा करता येणार नाही. त्यामुळे मुंबईत अनेक नामांकित गणेश मंडळांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. १०० वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना यंदा मंडळाच्या देव्हाऱ्यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीने करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे मूर्ती घडवण्यात येणार नाही. चांदीची मूर्ती पूजेला बसवून गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राखण्यास मदत करणार आहेत. कोरोना व्हायरसचं आव्हान पाहता नाईलाजास्तव आणि समाजहितासाठी म्हणून मानाची मंडळं या निर्णयावर पोहोचली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here