मालवणात मुसळधार; दोन दिवसात 390 मिमी पावसाची नोंद

सिंधुदुर्ग : मालवणात मुसळधार पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. शनिवारी सकाळी काहीशी उसंत घेतलेला पाऊस दुपार नंतर मुसळधार बरसला. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. दोन दिवसात तब्बल 390 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आचरा हिर्लेवाडी येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले. चिंदर गावठणवडी येथे दत्ताराम कदम यांच्या घराचा काही भाग कोसळून नुकसान झाले. मालवण शहरात गुरुनाथ धुरी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीची नोंद तालुका आपत्ती विभागाकडे करण्यात आली आहे. अन्य काही ठिकाणीही पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here