रत्नागिरी संघाचा खो – खो स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश

0

चिंचणी (जि. पालघर) : येथे सुरू असलेल्या ३८वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत किशोर गटात धाराशिव, रत्नागिरी, बीड, नाशिक, सांगली, सातारा तर किशोरींमध्ये धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी व सोलापूरने विजय मिळवत बाद फेरी गाठली.

चिंचणी येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत विजयी रत्नागिरीच्या कारण बलाडे ३.३०, २.१० मि. संरक्षण व २ गुण, कार्तिक सावंत २ मि. संरक्षण व ५ गुण, प्रसाद पाष्टे २.१० मि. संरक्षण व १ गुण तर पराभूत जळगावच्या दिपेश माळी ३.३० मि. संरक्षण व २ गुण, आर्यन पवार १.१०, १.२० मि. संरक्षण व १ गुण मिळवत सामन्यात वर्चस्व राखले. किशोरी गटात रत्नागिरीने अहमदनगर संघावर १ डाव ५ गुणांनी विजय मिळवला. त्यात सिया चव्हाणने ३ मिनिटे संरक्षण आणि १ खेळाडू बाद केला. स्वरांजली कर्लेकरने ३.२० सेकंद खेळ केला. वैष्णवी फुटक आणि रिद्धी चव्हाण यांनी प्रत्येकी ३ गुण मिळवले. रत्नागिरीच्या दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यांमध्ये किशोर गटामध्ये धाराशिवने यजमान पालघरचा १२-४ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवला.

या सामन्यात धाराशिवचे हारद्या वसावे ४.५० मि. संरक्षण व ३ गुण, पिंटू वळवी ३.२० मि. व १ गुण, भिमसिंग वसावे नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण तर पराभूत पालघरचा यशराज जाधव १.४०, १.१0 मि. संरक्षण व १ गुण यांनी चमकदार कामगिरी केली. किशोरांमध्ये साताऱ्याने मुंबई उपनगराचा ११-८ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात साताऱ्याच्या प्रथमेश कुंभार २.३० मि. संरक्षण व ४ गुण, शरद उबाळे नाबाद २.२० मि. संरक्षण व १ गुण, मयूर जाधव १.१०, नाबाद १.३० मि. संरक्षण व १ गुण यांनी तर उपनगराच्या पंकज यादव १.२० मि. संरक्षण व तन्मय पुजारे ३ गुण मिळवले. किशोर गटात रत्नागिरीने जळगावचा १७-७ असा १० गुणांनी पराभव केला. किशोरींच्या सामन्यात पुण्याने लातूरचा ११-९ असा ५.३० मि. राखून २ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात पुण्याच्या अक्षरा ढोले नाबाद ३.३०, २ मि. संरक्षण व १ गुण, धनश्री लाव्हाटे ३.३० मि. संरक्षण व २ गुण व अपर्णा वर्धे ३ गुण मिळवत यांनी विजयात मोठा वाट उचलला तर पराभूत लातूरच्या अस्मिता शिंदे १.३० मि. संरक्षण व २ गुण हिने एकहाती लढत दिली.

किशोरी गटामध्ये साताऱ्याने मुंबईचा १५-११ असा एक डाव ४ गुणांनी पराभव केला. यात या सामन्यात साताऱ्याच्या गौरी जाधव २.५०, ३.२० मि. संरक्षण व ४ गुण, वेदिका जाडकर २.१० मि. संरक्षण व १ गुण, इशिता लांडगे २.२० मि. संरक्षण यांनी विजय निश्चित केला तर मुंबईच्या कादंबरी तेरवणकर १.२० मि. संरक्षण व ४ गुण, सोनम शेलार व शार्वी नाडे प्रत्येकी २-२ गुण यांनी जोरदार लढत दिली; मात्र त्या मुंबईला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. किशोरांच्या इतर सामन्यात बीडने धुळ्याचा ६-५ असा ४.१० मि. राखून पराभव केला. नाशिकने छत्रपती संभाजी नगरचा ११-१० असा १ मि. राखून पराभव केला तर सांगलीने नगराचा १४-१२ असा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. किशोरींच्या सामन्यात धाराशिवने मुंबई उपनगराचा १९-४ असा एक डाव राखून पराभव केला. सांगलीने परभणीचा ८-५ असा एक डाव राखून पराभव केला तर सोलापूरने नंदुरबारचा १३-९ असा पराभव केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 02-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here