जिल्हा शासकीय रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणे प्राप्त

रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल यासाठी चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला दिली आहेत. या यंत्रामुळे खूप मोठी मदत कोरोना बाधितांना ऑक्सिजन पुरवताना होणार आहे. या मशिनमुळे नैसर्गिक ऑक्सिजन रुग्णाला घेता येत असतो. पर्यावरणमंत्र्यांनी ही उपकरणे पाठवल्यानंतर जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी त्याचा तात्काळ वापरही सुरु करण्यात आला आहे. ही उपकरणे दिल्याबद्दल रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी पर्यावरण मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 06-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here