रत्नागिरी : विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचा 4 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय मारुती कदम यांच्या नेतृत्वात 4 डिसेंबर 2023 ला सोमवारी रत्नागिरी शहर मारुती मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत ‘विमुक्त जाती भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा’ काढण्यात येत आहे.

या मोर्चाला जिल्ह्यातील समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज व सरोदे, गोंधळी, जोशी, नंदीवाले, नाथपंथी डवरी गोसावी, वडार भोरपी, NT(B) समाजाचे 5000 समाज बांधव उपस्थित राहणार आहे, ह्या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट एकच आहे NT(B) चे आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी आहे, NT(B) च आरक्षण वाढलं पाहिजे, एनटीबीला जिल्ह्यात जास्त जागा सुटल्या पाहिजे, केंद्र सरकारने राज्य सरकारला एक पत्र पाठवला आहे की राज्यातील भटक्या विमुक्तांचा सर्वे करून तो डाटा सेंटर गव्हर्मेंटला पाठवा त्याचा जो खर्च असेल ते सेंटर गव्हर्मेंट देईल असं राज्य सरकारला त्या पत्रात सांगितला आहे

पण राज्य सरकार अजून भटक्या विमुक्तांचा सर्वे करत नाहीये, भटक्या मुक्तांच्या सर्व योजनांची अंमलबजावणी होत नाहीये, त्यामुळे संजय मारुती कदम यांच्या नेतृत्वात रत्नागिरी शहर येथे मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत विमुक्त जाती भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे, हा मोर्चा कोणाच्याच विरोधात नसून हा मोर्चा भटक्या विमुक्तांचे समस्या व त्यावर उपाय संदर्भात आहे, या मोर्चाला जिल्ह्यातून मंडणगड, खेड, गुहागर, दापोली, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर असे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून समाज बांधव येणार आहे, हे आंदोलन कायद्याला धरून संविधानाचे पालन करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पारंपारिक पद्धतीने हे आंदोलन होणार आहे,

त्यामुळे जिल्हाभरातील सर्व प्रकारच्या संघटना सर्व प्रकारचे पदाधिकारी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विमुक्त जाती भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा कडून गणपत शिरसागर, वैभव सुर्वे, अमर वाडेकर, गोपाळ गोंधळी, दीपक भोरे, तानाजी वाघमारे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 02-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here