पिण्याचे पाणी, जल संवर्धनासाठी होणार जागर

0

जिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : जलजीवन मिशन कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. याचा प्रभावी प्रचार व शालेय विद्यार्थ्यांमध्ये पिण्याचे पाणी, संवर्धन याविषयी जनजागृती ” व्हावी, जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात होणार असून निबंधाची शब्दमर्यादा १५०० इतकी असणार आहे. शाळा स्तरावरील निबंध लेखन स्पर्धा ४० मिनिटांची असेल. स्पर्धेसाठी पाऊस संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हे जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावचा विकास, जलसंवर्धन काळाची गरज हे विषय असणार आहेत.

चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्त्व, पाण्याचे वितरण व करप्रणाली पाणीपुरवठा योजनेतील लोक सहभाग, पाणी पुरवठा योजनेतील पाणी देखभाल दुरूस्ती हे विषय असणार आहेत.

दोन्ही गटातील शालेय स्तरावरून प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुकास्तरावर एकत्रित करून तालुकास्तरावर क्रमांक निवडले जातील. त्यानंतर तालुकास्तरावरील स्पर्धकातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाना अनुक्रमे २१ हजार ११ हजार, ५ हजार तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. शालेय स्तरावरील निकाल १२ डिसेंबरपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:51 PM 02/Dec/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here