IND vs AUS 5th T20 : टीम इंडियाचा 6 धावांनी विजय

0

बंगळुरु : टीम इंडियाने पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती.

तेव्हा अर्शदीप सिंह याने 3 धावा देत सामना फिरवला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलं होतं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 04-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here