रत्नागिरीत आणखी 10 नवे कोरोना बाधित रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सध्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. सोमवारी सायंकाळी नव्याने कोरोनाचे 10 रुग्ण सापडून आले आहेत. हे रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 10 नव्या रुग्णांमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय सिविल मधील एका ब्रदरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. खासगी रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या जेल पोलीसच्या मुलाला देखील कोरोना झाला आहे. राजीवडा, कुवारबाव, संभाजीनगर नाचणे, नवानगर, सन्मित्रनगर या भागातील नवे रुग्ण आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:00 AM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here