रिपब्लिकन पक्षाचे 11 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे, घरे जाळल्याचे; दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. या घटनेच्या निषेधार्थ येत्या 11 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. हे निषेध आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here