‘जर चिनी सैन्याने घुसखोरी केलीच नाही, तर आता माघारी का जात आहे?’ : ओवैसी

नवी दिल्ली : लडाखमधून चिनी सैन्याने माघार घेतल्याचं वृत्त समोर आल्यानंतर लोकसभेचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सो़डलं आहे. जर कोणी आपल्या देशामध्ये घुसखोरी केलीच नव्हती तर ते परत कसे जात आहेत?, असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. चीनने डी अ‍ॅक्सलेशन सुरु केलं आहे याचा अर्थ काय?, असंही ओवैसींनी विचारलंय. ओवैसींनी तीन प्रश्न उपस्थित केले आहे. ट्विटवरुन एएनआयने पोस्ट केलेल्या अधिकृत वक्तव्यावर ओवैसींनी प्रतिक्रिया देताना मला तीन शंका आहेत असं म्हणतं ट्विट केलं आहे. चीनला जे हवं होतं ते त्याला देण्यात आलं आहे असा डी अ‍ॅक्सलेशनचा अर्थ घ्यावा का?, पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीही घुसखोरी केली नाही आणि कोणताही घुसखोर नाहीय मग हे डी अ‍ॅक्सलेशन कसलं?, आपण चीनवर विश्वास का ठेवत आहे, त्यांनी तर 6 जून रोजीही डी अ‍ॅक्सलेशनसाठी सहमती दर्शवली होती ना?, असे प्रश्न ओवैसींनी विचारले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:28 PM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here