WPL Auction 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 चा आज लिलाव

0

महिला प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League 2024) दुसऱ्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वूमेंस आयपीएलच्या दुसऱ्या सीझनसाठी म्हणजेच WPL 2024 साठी आज लिलाव पार पडणार आहे.

आज 9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीग 2024 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव शनिवारी मुंबईत होणार आहे.

वूमन्स आयपीएलचा लिलाव

आज होणाऱ्या लिलावामध्ये पाच संघ एकूण 17.65 कोटी रुपयांची खरेदी करणार आहेत. हे संघ जास्तीत जास्त 30 खेळाडू खरेदी करू शकतात. वूमन्स आयपीएल लिलावापूर्वी संघांनी अनेक खेळाडूंना सोडलं आहेत. मानसी जोशी आणि देविका वैद्य यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांना आजच्या लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. वूमेन्स प्रीमियर लीग ऑक्शन (Women’s Premier League 2024 Auction) 9 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे.

वूमन्स आयपीएलच्या पहिल्या हंगामाला चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष दुसऱ्या सीझनकडे लागलं आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघ चॅम्पियन ठरला होता. आता दुसऱ्या हंगामात मुंबई चॅम्पियनशिप कायम ठेवणार की दुसरा कोणता संघ बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. वूमेन्स आयपीएलच्या दुसऱ्या हंगामाच्या लिलावामध्ये 165 खेळाडूंवर बोली लागणार आहे.

एकूण 165 खेळाडूंवर बोली लागणार

महिला प्रीमियर लीग 2024 च्या आजच्या लिलावात पाच संघ एकूण 165 खेळाडूंवर बोली लावतील. यामध्ये 104 भारतीय खेळाडू आणि 61 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात पाच संघाकडे मिळून फक्त 30 स्लॉट उबलब्ध आहेत. यामध्ये 9 परदेशी खेळाडू घेणं आवश्यक आहे. पाच संघाकडे मिळून 17.65 कोटी रुपये रक्कम उपलब्ध आहे.

मानसी जोशीवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता

भारताची अनुभवी खेळाडू मानसी जोशीने गेल्या हंगामात अप्रतिम कामगिरी केली होती. गेल्या मोसमात ती गुजरात जायंट्सकडून खेळली होती. मात्र यंदाच्या हंगामात तिला रिलीझ करण्यात आलं आहे. मानसीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. तिने वनडेत 16 विकेट घेतल्या आहेत. लिलावात मानसीवर मोठी बोली लावली जाऊ शकते. मानसीचा अनुभव संघाला स्पर्धेत उपयोगी पडू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 09-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here