कुडाळ : राज्यात कुठेही आपत्ती अथवा कोणतेही संकट आले तरी शिवसेना पहिल्यांदा मदतीसाठी धावून जातेे. कोकणातील जनता ही आमच्या कुटुंबातील घटक आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या या पूरग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून जाणे आमचे कर्तव्य आहे. शिवसेना नेहमीक सामाजिक कार्यात पुढे असते. या सामाजिक भावनेतूनच आज पावशी गावातील पूरग्रस्त कुटूंबीयांना संसारपयोगी साहीत्य शिवसेनेच्या माध्यमातून वाटप केले जात आहे. तुम्ही कधीही हाक द्या, शिवसेना निश्चितच तुमच्या मदतीसाठी धावून येईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी पावशी येथे केले. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसहाय्य अंतर्गत पावशी गावातील 40 पूरग्रस्त कुटुंंबीयांना संसारपयोगी साहित्याचे वाटप रविवारी केंद्रीय उद्योगमंत्री अरविंद सावंत व जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पावशी येथील रवी तुळसकर यांच्या हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी आ. नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला आघाडी विधानसभा संपर्क प्रमुख सौ.सुचिता चिंदरकर, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, पं.स.सदस्य जयभारत पालव, युवासेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, महिला आघाडी तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, कुंदे सरपंच सचिन कदम, पावशी विभागप्रमुख दीपक आंगणे, उपविभाग प्रमुख बाळू पालव, महिला विभाग प्रमुख सौ.जान्हवी पवार, प्रसाद शेलटे, सागर भोगटे, राजन शेलटे, आबा शेलटे, नामदेव शेलटे, राजू गवंडे, धिरेंद्र चव्हाण, सुयोग ढवण, सुंदर तुळसकर, नाना वाडेकर, आ.वैभव नाईक यांची सुकन्या नंदिनी नाईक आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते. ना.सावंत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने देशाचा केंद्रीयमंत्री झालो आहे. मी सिंधुदुर्गचा सुपूत्र आहे. मात्र माझा मतदारसंघ मुंबईत आहे. तरीही कोकणातील जनता ही आमची भावंडे आहेत. या पुरामुळे संकटात सापडलेल्या भावंडांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही सर्वजण आमच्या कुटुंबातील घटक आहात. तुमचे दु:ख हे आमचे दु:ख आणि तुमच्या तुमच्या चेह-यावरील हास्य हे आमचे हास्य आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हा पूरग्रस्त कुटुंबीयांना संसारपयोगी साहित्य वाटप करीत आहोत. यापुढे कधीही आमची मदत लागली तर निश्चित हाक द्या, शिवसेना निश्चितच तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. आ.वैभव नाईक म्हणाले , पुरामुळे येथील अनेकांचे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी शिवसेना पक्ष धावून आला आहे. ना. अरविंद सावंत व आ. वैभव नाईक यांच्यासह उपस्थितांचे स्वागत पावशी सरपंच बाळा कोरगांवकर यांनी केले. जि.प.सदस्य अमरसेन सावंत यांनी प्रास्ताविक केले.
