‘सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय, कोरोनावर लस येणार आहे की कोरोना संपणार आहे?’ : युवासेना

मुंबई : राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु,यूजीसीने सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारला हा धक्का समजला जात आहे. त्यामुळे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी एचआरडीकडे धाव घेतली आहे. ‘सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय आहे. सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार आहे की कोरोना संपणार आहे? परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असताना घ्यायच्या होत्या’ अशी संतप्त भूमिका सरदेसाई यांनी मांडली. ‘आता जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतली तर त्यानंतर पेपर तपासणी, फेरतपासणी, निकाल लावणे यासाठी विद्यापीठाला मोठे मनुष्यबळ वापरावे लागणार आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत जानेवारी उजडू शकतो, यामुळं विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल’ अशी भीतीही सरदेसाई यांनी बोलून दाखवली. ‘यूजीसीच्या गाईडलाईन्स नुसारच राज्याने परीक्षा रद्द केल्या आहेत. पण, आता युजीसीने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले आहे म्हणून एचआरडी मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे, अशी माहितीही सरदेसाई यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here