खेड कंटेन्मेंट झोनमध्ये मोफत भाजीपाला वाटप

खेड : दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व खेड शहर शिवसेना यांच्यामार्फत खेड शहरातील वाणीपेठ, हनुमानपेठ, बाजारपेठ, कुंभार आळी येथील कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना मंगळवारी दि. ७ रोजी मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला. खेड शहरात कोठेही भाजीपाला उपलब्ध नसल्याने शहरात सर्वत्र नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवडा भासत आहे. याबाबतची माहिती आ. योगेश कदम यांना मिळताच त्यांनी त्वरित भाजीपाला उपलब्ध केला. खेड शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे यांच्या माध्यमातून शहरातील कंटन्मेंट झोनमधील नागरिकांना मंगळवारी दि. ७ रोजी भाजीपाला वाटप करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर सचिव पराग चिखले, नगरसेविका सीमा वंडकर, सुरभी धामणस्कर, नगरसेवक प्रज्योत तोडकरी, मिनार चिखले, तालुका आयटी सेल अधिकारी दर्शन महाजन, युवासेना उपशहर अधिकारी अभिजीत चिखले, स्वप्नील सैतवडेकर, परेश चिखले आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 08-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here