कोंढेतड येथे रोहित्र बसवण्याची मागणी

राजापुर : शहरानजीकच्या कोंढेतड गाडगीळवाडी येथील १०० केव्ही रोहित्र व थ्री फेज लाईन शॉटसर्कीट होऊन बंद अवस्थेत असल्याने त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे याठिकाणी त्वरित रोहित्र बसवून मिळावे, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. रोहित्र व थ्रीफेज लाईन बंद असल्याने घरगुती उपकरणे, टीव्ही, फ्रीज, पंखा, लाईट, विद्युतपंप, गावातील उद्योगधंदे, भट्टी, पोल्ट्री बंद पडून आर्थिक नुकसान होत आहे. थ्री फेज लाईनचे काम ऑगस्ट २०१९ ला पूर्ण झालेले असून अद्यापही लाईन सुरू झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. थ्री फेज लाईन तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 08-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here