‘देशात आर्थिक त्सुनामी येणार असं मी बोललो तेव्हा भाजप आणि माध्यमांनी माझी थट्टा केली’

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून, सेवा क्षेत्रासह अनेक उद्योग संकटात आले आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकार आणि माध्यमांवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये देशात आर्थिक त्सुनामी येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. पण, देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आणि माध्यमांवर केली. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं कि, ‘लघु व मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत. मोठमोठ्या कंपन्या प्रचंड तणावाखाली आहेत. बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वी आर्थिक त्सुनामी येणार असं म्हणालो होतो. देशाला सत्य परिस्थितीविषयी इशारा दिला होता. पण, त्यावरून भाजपा आणि माध्यमांनी माझी थट्टा केली होती,’ असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 08-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here