वाढीव वीज बिलांसंदर्भात लांजात आज शिबिर

लांजा : तालुक्यातील वीजग्राहकांच्या वाढीव वीज बिलांबाबत असलेल्या अडचणी आणि समस्यांच्या निराकरणासाठी गुरुवार दि. ९ जुलैला सांस्कृतिक भवन येथे विशेष शिबिर भरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू जाधव यांनी दिली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महावितरणच्या लांजा उपविभागात सातत्याने पाठपुरावा केला होता. लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य विविध पक्षांच्या माध्यमातून वाढीव वीज बिलासंदर्भात लांजा महावितरण उपविभागात सातत्याने आवाज उठविण्यात आला होता. याचे फलित म्हणून ९ जुलै रोजी तालुक्यातील वीजग्राहकांची वाढीव वीज बिलांसंदर्भात वीजबिलांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी हे शिबीर होणार आहे. ही माहिती महावितरणने संबंधित पक्षांच्या प्रमुखांना दिली आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू जाधव यांनी सांगितले की, आम्ही गेले काही दिवस महावितरण लांजा उपविभागात या वाढीव वीज बिल समस्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत होतो. यामुळेच हे शिबिर आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील वीज ग्राहकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या वाढीव वीजबिलांच्या अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:56 AM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here