‘घरडा कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाने सक्ती करू नये’

खेड : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खेडसह चिपळूणमधील कर्मचाऱ्यांनी घरडा कंपनीत जाऊ नये व सक्ती केल्यास अधिकाऱ्यांना चोख उत्तर देऊ, असा इशारा रिपाइंचे तालुकाध्यक्ष रजनीकांत जाधव यांनी दिला आहे. चिपळूण व खेडमधून घरडा कंपनीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कर्मचारी व कामगारांना कुठलीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here