राजगृह तोडफोड प्रकरणी निषेध

चिपळूण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहे. आमची अस्मिता आहे. कोकणचे सुपुत्र बाबासाहेबांच्या निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या मानसिकतेचा आपल्याकडून व राष्ट्रवादी पक्षाकडून तीव्र निषेध आहे, अशा शब्दांत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, त्यांच्या विचाराला कुणीही धक्का लावू शकत नाही. दरम्यान, चिपळूण व संगमेश्वरमधील जनतेने शांतता, संयम पाळावा, असे आवाहनही आ. निकम यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 09-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here