रत्नागिरी शहरातील दुकाने एक आड एक लेन याप्रमाणे उघडणार

रत्नागिरी : १५ जुलै पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या नव्या लॉकडाऊन मुळे आधीच अडचणीत असणाऱ्या व्यापाऱ्यांनी नापसंती व्यक्त केली होती. याची तातडीने दखल घेत ना. उदय सामंत यांनी आज सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रत्येक तालुक्यातील बाजारपेठेच्या भौगोलिक रचनेनुसार तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. यानुसार प्रत्येक प्रांताधिकारी यांना जिल्हाधिकारी यांना आदेश काढले असून रत्नागिरी शहरातील बाजारपेठ दिनांक १३ मे २०२० रोजी काढलेल्या आदेशातील व्यवस्थेप्रमाणे उघडणार आहे. यानुसार एक आड एक दिवस डाव्या उजव्या बाजूची दुकाने उघडणार असून रविवारी स्नापूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. याबाबत एक महत्वपूर्ण बैठक आज प्रांत कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला प्रांत विकास सूर्यवंशी, तहसीलदार जाधव, मुख्याधिकारी ठोंबरे, पोलीस निरीक्षक अनिल लाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे, उपाध्यक्ष राजकुमार जैन व रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु उपस्थित होते. या बैठकीत ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा करून निर्णय घेण्यात आला. आज रात्री ९ वाजता ना. उदय सामंत पुन्हा एकदा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार असून या बैठकीत देखील काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:54 PM 09/Jul/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here