कशेडी घाटात कंटेनर-टँकरची धडक

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील तीव्र उतारावर कंटेनर चालकाचा ताबा सुटून कंटेनरने मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या टँकरला धडक दिली. अपघातात टँकरचालक टँकरच्या केबिनमध्ये अडकला होता. त्याला वाहतूक पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले. त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा अपघात गुरुवारी दि. ९ सकाळी नऊच्या सुमारास झाला. गंभीर जखमी असलेल्या चालकांचे नाव अरविंद गुप्ता (वय ३०) असे आहे. कंटेनर (एनएल-०१-एडी-७६४९) मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. कशेडी घाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून हा कंटेनर समोरून येणाऱ्या टँकरवर आदळला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 10-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here